कारवर रक्ताचे डाग, कार रिकामी…तिलारी मधील घटनेने खळबळ

दाे़डामार्ग (प्रतिनिधी) : तिलारी मुख्य पुलानजीक आज सकाळी एक चारचाकी वाहन आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वाहन पूर्णपणे रक्ताने माखलेले असून, गाडीची नंबर प्लेटसुद्धा गायब असल्याने घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटना स्थळ अत्यंत अडचणीच्या जागी असल्याने वाहन तिथे कसे आले, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना त्वरित कळवले असून, पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे.

दरम्यान, गाडीतील रक्ताचे प्रमाण पाहता ही साधी अपघाताची घटना नसून काहीतरी वेगळं प्रकरण असू शकतं, अशी चर्चा तिलारी परिसरात रंगत आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपास सुरू असून, घटनेचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत

error: Content is protected !!