कणकवलीत ‘अलंकार मंगल कार्यालय’चे भव्य उद्घाटन
कणकवली (प्रतिनिधी) : शहरापासून हाकेच्या अंतरावर, प्रशस्त व रस्त्यालगतच्या जागेत साकारलेल्या ‘अलंकार मंगल कार्यालय’ चा शुभारंभ आज सकाळी ११ वाजता संपन्न झाला. कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे काका सुधाकर नलावडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच राज नलावडे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा पार पडली. या प्रसंगी समीर नलावडे, सुप्रिया समीर नलावडे, राज समीर नलावडे यांसह नलावडे परिवारातील सदस्य, आप्तेष्ट व मान्यवरांची उपस्थिती लाभली.
जानवली येथील सावडाव-तरंदळे रोड वरील गणेश मंदिर व माती रिसॉर्ट जवळ हे अलंकार मंगल कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कणकवली तालुक्यातील जानवली येथील हॉटेल नीलम कंट्रीसाईडच्या मागील रस्त्याने काही अंतर गेल्यावर हे प्रशस्त असे अलंकार मंगल कार्यालय साकार झाले आहे.
या मंगल कार्यालयामध्ये साखरपुडा, लग्न, वाढदिवस यासह अन्य विविध समारंभ प्रशस्त जागेमध्ये करण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे. प्रशस्त एसी बँक्केट हॉल, मुबलक पार्किंगची सुविधा, व्हीआयपी लाउंज, मोठ्या समारंभाला पुरेसा असा जनरेटर बॅकअप, बुफे सिस्टीम जेवण, जेवणासाठी व समारंभासाठी अनुभवी मॅनेजमेंट टीम यासह अन्य अनेक सुविधा व आकर्षक सजावट या सर्व सोयीने सुसज्ज असलेले हे मंगल कार्यालय आजपासून जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. कोणत्याही समारंभासाठी या मंगल कार्यालयाचे बुकिंग सुरू करण्यात आले आहे. “इव्हेंट कुठलाही असू दे, त्यासाठी निवड ही फक्त अलंकार मंगल कार्यालयाचीच” अशी टॅगलाईन घेत हे अलंकार मंगल कार्यालय नव्या दिमाखदार रूपात सिंधुदुर्ग वासियांच्या सेवेकरीता दाखल होत आहे.












