वैभववाडीत उद्या मातृशक्ती महिला मेळावा पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी (प्रतिनिधी) : आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान अंतर्गत वैभववाडी येथे मातृशक्ती महिला मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. करण्यात आले आहे. हा मेळावा येथील पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न होणार आहे. या मेळाव्याला मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान वैभववाडी तालुक्यात विविध विकास कामांची उद्घाटने पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडणार आहेत. यामध्ये वैभववाडी दत्त मंदिर येथे विश्रांती कट्टा उद्घाटन सोहळा सकाळी पार पडणार आहे. एडगांव येथे विजय साळसकर स्मारक सुशोभीकरण व सौर पथदीप उद्घाटन सोहळा सकाळी १०.३० वा. संपन्न होणार आहे. एडगांव – वायंबोशी येथे मनुदेवी मंदिर नजीक उभारण्यात आलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज भवन इमारतीचा उद्घाटन सोहळा १०.४५ वा. होणार आहे. त्याचबरोबर वैभववाडी पंचायत समिती येथे पत्रकार कक्षाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी पंचायत समिती येथे आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानांतर्गत भव्य मातृशक्ती महिला मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्याला शासकीय, निमशासकीय सर्व महिला कर्मचारी वर्ग तसेच बचत गटातील महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पंचायत समिती वैभववाडी यांच्याकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!