एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने विक्रम यादव यांचा सत्कार

वैभववाडी (प्रतिनिधी) : एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडी कार्तिकी पायी वारी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने सांगली येथे बॉंबे ब्लडग्रुप रक्तदाते तसेच बॉंबे ब्लडग्रुप ऑर्गनायझरचे संस्थापक विक्रम यादव यांच्या लोककल्याणकारी कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

जगातील अत्यंत दुर्मिळ असणारा बॉंबे ब्लडग्रुप (Oh/Hh) चे विक्रम यादव (तासगाव) यांनी आजवर ७१ वेळा रक्तदान केले आहे. हल्लीच त्यांनी दिल्ली येथे जात रक्तदान केले आहे. आजवर अनेक देशात विक्रम यादव यांचे रक्तदान झाले आहे. सिंधुदुर्गातही ते रक्तदानासाठी आले आहेत. वारकरी संप्रदाय व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्यावतीने विक्रम यादव यांचा हा उचीत गौरव करण्यात आला.

यावेळी वैभवाडी शाखेचे अध्यक्ष राजेश पडवळ व एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडी कार्तिकी पायी वारीचे हभप अशोक कुडाळकर माऊली यांनी वारकरी संप्रदाय यांच्या वतीने सत्कार केला त्या वेळी बहुसंख्येने वारकरी माऊली उपस्थित होते.

error: Content is protected !!