कणकवली (प्रतिनिधी) : नुकतेच पुणे येथील जवाहरलाल नेहरू सभागृह शिवाजीनगर येथे आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने 2025 चे उद्योग क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये प्रतिक कोतवाल यांना महाराष्ट्र उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कणकवली कॉलेजचे माजी प्राध्यापक कै. खंडेराव कोतवाल यांचा प्रतीक हा कनिष्ठ सुपुत्र आहे. माझ्या वडिलांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने मी उद्योग क्षेत्रात आलो. उत्तम नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हा वडिलांनी दिलेला मूलमंत्र मी जोपासला त्यामुळे सलग दोन वर्ष मी हे यश मिळवू शकलो. हा मी माझ्या वडिलांचा आशीर्वाद समजतो, असे मनोगत प्रतिकने पुरस्कार प्रसंगी व्यक्त केले. यावेळी त्यांच्या प्रवासात साथ देणाऱ्या कुटुंबीयांचे आणि मित्र परिवाराचे त्यांनी आभार मानले.
बदलत्या युगाप्रमाणे आपणही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले जीवन सुसह्य केले पाहिजे, याचा ध्यास धरून प्रतिकने ट्रॅव्हल आणि टाटा इन्शुरन्स ठीकठिकाणी पोहोचवून शहरी व ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांना योग्य मार्गदर्शन केले आहे. त्याच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.












