फुलविक्रेत्या वृद्धाची आत्महत्या

मालवण (प्रतिनिधी) : शहरातील बाजारपेठेत चाफ्याची फुले विक्री करणारे फुलविक्रेते चंद्रकांत वसंत फोंडेकर (वय ६५, रा. भरडेवाडी, कुंभारमाठ) यांनी स्वतःच्या अंगणातील चाफ्याच्याच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मालवण पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा असा परिवार आहे.

error: Content is protected !!