रतांब्याच्या व्हाळावरील हायवे पुलाची दुर्दशा ! जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मुंबई- गोवा हायवे रस्त्यावर, कणकवली तालुक्यातील जानवली दरम्यान रतांब्याचा व्हाळ येथे पुलाची बांधणी न करताच जुन्या पुलाची डागडुजी व रंगकाम करून ठेकेदाराने काम पूर्ण करून बिल केल्याचे आता उघड होत आहे. वस्तुतः हायवे रस्त्यातील येणारे पूल नवीन बांधून ते वाहतुकीसाठी सक्षम- सुलभ करणे आवश्यक आहे. मात्र सदर जुन्या पुलाचे बांधकाम न करता त्याची डागडुजी करून व पांढरी- काळी रंगरंगोटी केल्याचे आता पुढे येत आहे. त्यामुळे आता बांधकामाचे सिमेंट सांधे सुटले आहेत. संरक्षक कठडे व भिंतीमध्ये गवत झुडपे यांची वाढ झाल्यामुळे पुलाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. साईड पट्टीला सुद्धा मातीचा भराव आहे. याकडे वाहन चालक वाहक यांनी संबंधित विभागाचे लक्ष वेधले असुन योग्य कारवाईची मागणी जोर धरत आहे…

error: Content is protected !!