मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला ५०वा वाढदिवस साजरा करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात
बच्चेकंपनीसोबत चाहत्यांची उसळली गर्दी
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : जगभरातील क्रिकेट प्रेमीचा लाडका व भारतीय क्रिकेट विश्वाचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज आपला ५० वा वाढदिवस मायभूमी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा करणार आहे. त्यासाठी तो परुळे गावांतील सागर किनारी उतरला आहे. त्याने परुळे गावातील समुद्री पर्यटनाचा काल आनंद लुटला, भोगवे, किल्ले निवती सागर किनाऱ्यावर त्याने पर्यटनांचा आनंद घेतला. दरम्यान आयपीएलच्या समन्यांतून आणि आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सचिन तेंडुलकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देत आपला 50 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आला आहे. काल त्यांनी परुळे भोगवे यथील हॉटेलमध्ये मुक्काम केला. किल्ले निवती-भोगवे सागर किनाऱ्याला फेर फटका मारला व यावेळी सर्वच क्रिकेट प्रेमींना त्यांच्या दर्शनाने खुपच आनंद झाला. त्याने सर्वांसोबत फोटो काढले. यावेळी त्याचे सहकारीदेखील उपस्थित होते. क्रिकेटच्या निमित्ताने सचिन जगभर फिरला आहे. परंतु भोगवे – निवती सारखा सुंदर, स्वच्छसागर किना-यावर फिरताना आपल्याला विशेष आनंद झाला, असे त्याने यावेळी बोलताना सांगितले












