मनसे कणकवली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक संदीप दळवी आणि गजानन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली-देवगड विधानसभा संपर्क अध्यक्ष संतोष शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली विधानसभा मतदारसंघातील स्थानिक जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक हॉटेल सावली, कणकवली येथे रविवार 9 नोव्हेंबर रोजी पार पडली.

या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बळकटीकरण, नियोजन तसेच स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस उपस्थित मान्यवर सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब, उपजिल्हाध्यक्ष चंदन मेस्त्री, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, जिल्हा सचिव सचिन तावडे, देवगड-कणकवली विधानसभा प्रसिद्धी माध्यम प्रमुख महेश नलावडे, कणकवली तालुकाध्यक्ष शांताराम सादये, देवगड तालुकाध्यक्ष संतोष मयेकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष महेश कदम, देवगड तालुका संपर्क अध्यक्ष नितीन पवार, देवगड तालुका सहसंपर्क अध्यक्ष अमोल खोत, मनविसे जिल्हा संपर्क अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, मनविसे जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे, मनविसे उप जिल्हाध्यक्ष राजा मिराशी, मनविसे देवगड तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावरील इतर पदाधिकारी, उप तालुकाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शहर अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!