खारेपाटण (प्रतिनिधी) : पायरी सावक संघ नडगीवे शाखा मुंबई व संघमित्रा महिला संघ नडगिवे मुंबई या दोन्ही मंडळांच्या संयुक्त विद्यमाने वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दीन सोहळा व मंडळाचा स्नेहमेळावा कार्यक्रम नुकताच मुंबई ,देवराज हॉल दादर येथे संपन्न झाला.
पायरी सावक संघ नडगिवे, मुंबई.या मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर सहदेव पगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या स्नेहमेळावा कार्यक्रमाला संतोष पगारे.उद्देश पगारे, निलेश पगारे, प्रतीक पगारे,आयुष पगारे,विनय पगारे,विशारद पगारे,दिनेश पगारे, दीपक पगारे,सुरेश पगारे,गंगाधर रिंगणेकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सभासदांना व त्यांच्या मुलांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. तर लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित प्रेषक व सभासदांची दाद मिळवली.या संपूर्ण स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी नडगीवे बौद्ध समाज भावकी मंडळाचे मुंबई स्थित सुमारे १५० ग्रामस्थ उपस्थित होते.तर या उपस्थित असलेले पाहुणे मंडळी. आणि संघातील ६२ सभासद यांना एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांच्या सहपरिवार,सहकुटुंबासहित भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर पगारे तसेच कार्यकर्ते दीपक पगारे, सुरेश पगारे, संतोष पगारे यांनी संघाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुंबई मंडळाचे चिटणीस नितीन पगारे यांनी मानले.












