एस. आर. दळवी (I) फाऊंडेशनच्या वैभववाडी तालुकाध्यक्ष पदी संदेश तुळसणकर तर सचिवपदी राजेश कळसुलकर यांची निवड

फाऊंडेशनच्या माध्यमातून गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य संस्थेमार्फत केले जाणार – संदेश तुळसणकर

वैभववाडी टीचर फोरमची नुतन कार्यकारिणी जाहीर

वैभववाडी (प्रतिनिधी) : एस. आर. दळवी (I) फाऊंडेशनच्या, वैभववाडी तालुक्याच्या नुतन कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, संस्थेचे संस्थापक रामचंद्र दळवी आणि सीता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याध्यक्ष महेश सावंत आणि जिल्हाध्यक्ष चेतन बोडेकर यांच्या प्रयत्नातून वैभववाडी तालुक्याची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यामध्ये वैभववाडी येथील शिक्षक संदेश तुळसणकर यांची तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी (सदस्यत्व विकास) अर्जुन जयवंत बोरकर व उपाध्यक्ष (कार्यक्रम) पदावर निलोफर मौला शेख सचिवपदी राजेश कानु कळसुलकर तर सहसचिवपदी गणेश जयराम सावंत यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संध्या संदीप शेळके आणि प्रफुल तुकाराम जाधव यांची सल्लागारपदी निवड झाली आहे.

एस. आर. दळवी फाऊंडेशन या संस्थेमार्फत सर्वांचे अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या आहेत. एस. आर. दळवी (I) फाऊंडेशन ही संस्था शिक्षक सक्षमीकरण व पर्यावरण संवर्धन हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारा कोणीही व्यक्ती मग तो अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा उच्च शिक्षण या कोणत्याही गटातील असला तरी तो संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतो. ही संस्था कोणत्याही प्रकारची शिक्षक संघटना नसून शिक्षकाचा व्यावसायिक विकास व्हावा, त्यांना शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, शिक्षकांमधील सुप्त कलागुणांचे प्रकटीकरण व्हावे, म्हणून विविध स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे विविध उपक्रम राबविणारी आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करणारी ही संस्था आहे. संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन संस्थेला सहकार्य करावे, अशी आशा नूतन तालुकाध्यक्ष संदेश तुळसणकर यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या माध्यमातून गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचा जगभर प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य संस्थेमार्फत केले जाणार असल्याचेही तुळसणकर यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!