कणकवलीत जिल्हास्तरीय कॅडेट तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : तायक्वांडो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग या अधिकृत जिल्हा संघटने मार्फत व सिंधुरत्न स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या आयोजनात तांबे भवन हॉल कलमठ , कणकवली येथे रविवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय कॅडेट तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. स्पर्धेला जिल्हाभरातील कॅडेट (१२ ते १४वर्षातील) खेळाडूंनी उपस्थिती लावली.

स्पर्धा क्युरोगी व पुमसे या प्रकारात घेण्यात आली. निवड झालेली जिल्हयाची टीम शिर्डी ,अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल. निवड झालेली टीम पुढील प्रमाणे मुले – श्रवण राणे , पार्थ राणे , प्रत्युश पाताडे , चिराग रेपाल , श्रेयस नार्वेकर , जैत्र पटेल , रुद्र पाटील , अर्णव काळगे , आराध्य गोडवे मुली – ओवी बाईत , दुर्वा पवार , दिपश्री तेंडुलकर , शरयू पाटील , संयुक्तराजे आबदर , ऋचा चव्हाण , स्वरा चव्हाण , वैष्णवी चोडणकर, स्पृहा राणे , माऊली राणे पुमसे – ऋचा चव्हाण (वैयक्तिक) उद्घाटन प्रसंगी जिल्हा संघटनेचे खजिनदार सुधीर राणे, विनायक सापळे,अमित जोशी ,एकनाथ धनवटे चॅम्पियन अकॅडमी चे मंदार परब श्रीमती नाईक, श्रीमती मुळे कु. भाग्यश्री कसालकर आदी उपस्थित होते. स्पर्धा पंच म्हणून कु. लाजरी वातकर , कु. भाग्यश्री जाधव प्रथमेश पावसकर बाळदत्त सावंत यांनी काम पाहिले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिंधुरत्न स्पोर्ट्स अकॅडमी चेअविराज खांडेकर,बाळदत्त सावंत, श्रीमती जयश्री बांदेकर,प्रणव जोशी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!