मुंबई (प्रतिनिधी) : मिरा-भाईंदर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मिरा-भाईंदर) यांच्या सौजन्याने रविवार, दिनांक १६ नोव्हेंबर रोजी नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ८.०० ते दुपारी १.०० या वेळेत पार पडणार असून सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे मोफत आहे.
या शिबिरात डोळ्यांची तपासणी, मधुमेह तपासणी, रक्त तपासणी, स्त्रीरोगतज्ज्ञ तपासणी, ईसीजी तपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासोबतच आहार आणि अन्नाविषयी जागरुकता कार्यक्रम व आरोग्य जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शिबिरात डॉ. देवेशकृष्ण यादव (M.B.B.S, D.F.M) यांच्याकडून मोफत वैद्यकीय सल्ला मिळणार आहे.
हे शिबिर वृंदावन हॉस्पिटल आणि हायड्रा लॅब यांच्या सौजन्याने मीरा रोड (पूर्व) येथील शॉप नं. १०, आकांक्षा बिल्डिंग, नित्यानंद नगर समोर, शांती गार्डन येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9619515188 आणि 9867742551 या नंबरवर संपर्क साधावा.
या शिबिर मिरा-भाईंदर शहर सहसचिव मनोज के. गिरी व मिरा-भाईंदर शहर १४५ विधानसभा अध्यक्षसंतोष शिंगाडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले असूननागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.












