आमदार निलेश राणेंची कणकवली, मालवण नगरपरिषद निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती

मालवण (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत आणि मालवण नगरपरिषद निवडणूकीसाठी शिवसेनेचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आमदार निलेश राणे यांची निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषद निवडणूक साठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे नामनिर्देशन दाखल करण्यासाठी 17 नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे. मात्र रविवार साप्ताहिक शासकीय सुट्टी वगळून 14 नोव्हेंबर पासून नामनिर्देशन दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिंदे शिवसेना युतीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. शिंदे शिवसेनेच्या वतीने भाजपासोबत कणकवली आणि मालवण नगरपरिषद निवडणूक संदर्भात युतीचे निर्णय निवडणूक प्रभारी म्हणून आमदार निलेश राणे घेणार आहेत.

error: Content is protected !!