कणकवली (प्रतिनिधी) : शुभकार्याची सुरुवात आपण नेहमी श्रीफळ वाढवून करतो. माझ्यासह सर्व सहकारी नगरसेवक उमेदवारांना नारळ चिन्ह मिळाले आहे. नारळ चिन्ह घेऊन आम्ही शुभकार्याची सुरुवात करत आहोत. कणकवली शहरात परिवर्तनासाठी आम्ही नारळ निशाणी घेऊन जनतेसमोर जात आहोत. विरोधकांनी कितीही पैशांचा बाजार मांडला तरी कणकवलीची जनता बधणार नाही. भ्रष्टाचारी भाजपाच्या उमेदवारांना कणकवलीकर घरी बसवतील, असा विश्वास शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी व्यक्त केला. कणकवली शहराच्या मूलभूत गरजा पूर्ण करतानाच सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही पारकर म्हणाले.
नारळ शुभकार्याची निशाणी












