कणकवली (प्रतिनिधी) : शहर विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर आम्ही पालकमंत्री नितेश राणेंकडे विकासनिधी साठी जाऊ. त्यांनी ठरवावे निधी द्यावा की न द्यावा.शहर विकासासाठी निधी मागण्यासाठी आम्ही सत्तेतील मंत्री, राज्य सरकारकडे नक्कीच जाऊ असे शहरविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर म्हणाले. जनतेने कणकवली ची लढाई आता स्वतःच्या हातात घेतली आहे. संदेश पारकर कणकवलीच्या जनतेच्या मनात आहे. भले विरोधकांनी मतांसाठी पैसेवाटप केले तरी जनता आपले मत परिवर्तनाला देणार आहे. भ्रष्टाचारातून कमावलेले पैसे विरोधक वाटत आहेत, विरोधक वाटत असलेले पैसे हे जनतेचे आहेत. त्यामुळे घरात आलेली लक्ष्मी स्वीकारा आणि मत मात्र भाजपाच्या विरोधात द्या असे या आवाहनही पारकर यांनी केले.
होय आम्ही शहर विकास निधीसाठी पालकमंत्र्यांकडे जाणार












