आचरा (प्रतिनिधी) : जागृत उन्नती मंडळ त्रिंबक या संस्थेने त्रिंबक गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा याकरिता २०२६ सालची दिनदर्शिका दिनांक २६ नोव्हेंबर रोजी जनता विद्या मंदिर त्रिंबक येथील सभागृहात प्रकाशित केली. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून संस्थेला जाहिरात देणगी म्हणून रुपये ६ लाख ५ हजार मिळाले.
या प्रसंगी प्रमुख पाहूणे जेष्ठ समाज सेवक सुरेश ठाकूर गुरुजी यांनी गावाच्या विकासासाठी या मंडळाने निधी मिळवण्या करीता कलेंडरची निर्मिती केली या बद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले. आणि आपण आज पर्यंत पाहिलेल्या दिनदर्शिके मध्ये हि दिनदर्शिका माहिती पूर्ण आणि सुबक असल्याचे सांगितले. अरविंद कदम चिटणीस यांनी प्रास्ताविक करतांना दिनदर्शिका छपाई आणि देणगी याचा आढावा मांडला. तसेच संतोष त्रिंबककर कोषाध्यक्ष यांनी प्राप्त देणगी आणि झालेला खर्च या बाबत सभागृहाला माहिती दिली.
यावेळी दिनदर्शिके करीता देणगी देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुरेश ठाकूर गुरुजी यांच्या शब्दांच्या पलीकडे या शालेय उपयोगी पुस्तकांच्या ५० प्रती जागृत मंडळा कडून मुख्याध्यापक प्रवीण घाडीगांवकर यांच्या कडे देण्यात आल्या. या प्रसंगी सुरेंद्र सकपाळ, चेतन साटम, बाळा बागवे, अमित पवार, प्रवीण घाडीगांवकर, उदय मेहेंदळे यानी मनोगते व्यक्त केली.
या सभेचे अध्यक्ष दत्ता पवार यांनी संस्थेच्या स्थापनेचा उद्देश. प्राप्त झालेल्या निधीचा योग्य कामा करीताच वापर होईल याची हमी दिली. मुंबई आणि ग्रामस्थ यांनी मिळून गावाच्या विकासासाठी काम करूया असे भावनीक आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गेश शेटे आणि आभार नवनीत घाडीगांवकर यांनी मांडले, या कार्यक्रमा करीता मुंबई हून संतोष त्रिंबककर, दत्ता पवार, चेतन साटम, अरविंद कदम, अनिल कदम, तूषार चिंदरकर, मंगेश शेटे, दिगंबर साटम, सुनील जाधव, विश्वंभर राउत. तसेच ग्रामीण शाखेचे बाळा बागवे, उदय मेहेंदळे, किशोर त्रिंबककर, आशिश बागवे, सिताराम सकपाळ, श्रीकांत बागवे, संभाजी शेटगे, संतोषी सावंत, अजय पवार, सुचीता घाडीगांवकर,नेहा वैगुर्लेकर, माधुरी कामतेकर, ग्रीष्मा बागवे, अस्मि वर्देकर, छाया साटम, अर्चना त्रिंबककर अशोक बागवे, विशाल मेस्त्री आदी मान्यवर आणि बहूसंख्य ग्रामस्थ उपस्थिती होते.











