मालवण (प्रतिनिधी) : आगामी नगरपंचायत निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीतील प्रचाराची मुदत आयोगाने आता एक दिवस वाढवली आहे. त्यामुळे उमेदवारांना १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचून प्रचार करता येणार आहे. याआधी प्रचारासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतच कालमर्यादा होती.
अतिरिक्त दिवस मिळाल्याने सर्वच उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त होत असून, मतदारांशी अधिक संपर्क साधण्याची संधी मिळणार आहे. निवडणूक प्रचाराची मुदत संपल्यानंतर २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.











