आचरा (प्रतिनिधी) : आचरा गाऊडवाडी येथील रहिवासी सुप्रसिद्ध भजनी बुवा, रामेश्वर विद्या मंदिर आचरा पिरावाडी येथील सेवानिवृत्त कर्मचारी, मोहन शांताराम पांगे यांचे काल ७ डिसेंबर रोजी मुंबई येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. मनमिळावू आणि सुस्वभावी म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
आचरा गाऊडवाडी येथील मोहन शांताराम पांगे यांचे निधन











