भगवती माऊली यात्रोत्सवा निमित्त श्री देवी भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडीची निर्मिती आणि आयोजन
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर भगवती माऊली यात्रोत्सव मोठ्या थाटात साजरा होत असून आज लळीत उत्सव म्हणजेच यात्रोत्सवाच्या समाप्ती दिनी सोमवार ८ डिसेंबर रोजी रात्रौ १० वाजता कै. संदीप पारकर यांच्या सुवर्णकर्तृत्वाने झळाळलेल्या, रंगभूमीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी श्री देवी भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी व चिंदर भटवाडी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई यांच्या पुढाकाराने श्री देवी भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी निर्मित सामाजिक, कौटुंबिक, हृदयस्पर्शी तीन अंकी नाटक ‘सासुरवास’ हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे.
या नाटकाचे लेखक – कमलाकर बोरकर, दिग्दर्शक- सुभाष नाटेकर, आशिष नाबर, सहाय्यक दिग्दर्शक- बावली गांवकर, मंगेश नाटेकर, ध्वनी संकलन-प्रकाश योजना शरद कांबळी (रेवंडी), रंगभूषा- तारक कांबळी (रेवंडी), संगीत साथ- संदीप परब, तबला साथ- गणेश गोगटे, पार्श्वसंगीत- परशुराम गुरव करणार असून नाटकात दिगंबर जाधव, आयुष पवार, रवी गावडे, रोहन पाटणकर, प्रथमेश पवार, उत्तम शेडगे, सायली शिवलकर (तळेबाजार) तर तुफान विनोदी भूमिकेत- संजय हडपी, विश्वनाथ उर्फ पिंट्या दळवी भूमीका साकारणार आहेत. या नाट्य प्रयोगासाठी बारापाच वतनदार, गावकरी व माऊली सेवा समिती चिंदर व ग्रामस्थ चिंदर यांचे विशेष सहकार्य लाभले असून नाट्य रसिक, प्रेक्षकांनी उपस्थित राहून नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री देवी भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी, माऊली सेवा समिती बारा पाच वतनदार, ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.











