मालवण (प्रतिनिधी) : किल्ले निवती येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहिम राबवून किल्ल्यावरील महादरवाजा पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. झाडी–झुडपांनी झाकोळलेला दरवाजा मोकळा करून परिसर नव्याने खुला केला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे किल्ले निवतीवर स्वच्छता व संवर्धन उपक्रम आयोजित करण्यात आला. या मोहिमेत किल्ल्याचे सौंदर्य जपण्याच्या दृष्टीने काटेरी झुडपे हटविणे, कचरा साफ करणे आदी कामे करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत स्वप्निल साळसकर, ज्ञानेश्वर राणे, यतिन सावंत, प्रसाद पेंडूरकर, साईप्रसाद मसगे, हेमलता जाधव, समिल नाईक, गणेश नाईक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.












