खारेपाटण येथे तेली समाज बांधवांच्या वतीने श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : तेली समाज खारेपाटण व संताजी सेवा मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती आज सोमवार दि.८ डिसेंबर, २०२५ रोजी श्री हनुमान मंदिर, खारेपाटण येथे उत्साहात संपन्न झाली. प्रारंभी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन करून खारेपाटण तेली समाज बांधव मंडळाचे अध्यक्ष रमेश जामसंडेकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी समाज बांधवांच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची सामूहिक महाआरती घेण्यात आली. यामध्ये सर्व महिला पुरुष यांनी सामुदायिक सहभाग घेतला.

या कार्यक्रमाला तेली समाज बांधव कणकवली तालुक्याचे कार्यकर्ते महेश कोळसुलकर, समाजाच्या महिला कार्यकर्त्या व प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था खारेपाटण च्या संचालिका मनस्वी कोळसुलकर तसेच संताजी सेवा मंडळ खारेपाटण या मंडळाचे उपाध्यक्ष मनोहर तेली, सचिव गणेश तेली, खजिनदार नारायण कोळसुलकर, गणेश जामसंडेकर, प्रकाश नानिवडेकर, शाम कोळसुलकर, नाना झगडे, राजन कोळसुलकर, बबन तेली, सुरेश कोळसुलकर, सुनील तळगावकर आदी प्रमुख समाज बांधव उपस्थित होते. तसेच तेली समाजाच्या महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचा समाजातील कर्तृत्वान गुणवंत महिला व पुरुष यांचा संताजी सेवा मंडळ खारेपाटणच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी समाजातील नागरिकांना समाज प्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले. तर दुपारी समाज बांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन कारण्यात आले होते. तसेच महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन देखील यावेळी मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

error: Content is protected !!