संत सेवा, ज्येष्ठ वारकरी व कीर्तनकार पुरस्कारांचे होणार वितरण; १८ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्गच्या वतीने दर वर्षी दोन वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘संत सेवा पुरस्कार व जेष्ठ कीर्तनकार’ साठी इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. वय वर्ष 65 पूर्ण असलेल्या ज्येष्ठानाच हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी जेष्ठ मृदूंगमणी पुरस्कार दोन पुरस्कार, वय वर्ष 65, तसेच एक जेष्ठ वारकरी पुरस्कार वय वर्ष 80 या प्रमाणे आणखीन दोन पुरस्कार दिले जाणार आहेत. हे पुरस्कार जिल्हा वारकरी संप्रदाय तर्फे दिले जाणार आहेत.
अर्जदार हा मंडळाचा सभासद असावा. तरी यावर्षी 2025 चे वरील पुरस्कार बाबत सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायकडे अर्ज करावा. संपर्क – विश्वनाथ कृष्णा गवंडळकर – 9420261934, गणपत विश्राम घाडीगावकर – 9623884116, तसेच पत्र व्यवहार – मधुकर प्रभूगावकर, साई श्रद्धा निवास, जळकेवाडी, कणकवली, या पत्यावर दिनांक 18 डिसेंबर, 20 25 पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











