आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी या हायस्कूलच्या क्रिडामहोत्सवाला आज बुधवार दि. १०/१२/२०२५ रोजी प्रारंभ झाला. या क्रिडामहोत्सवाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी क्रिडाज्योत प्रज्वलित करून व श्रीफळ वाढवून केले. क्रिडा शिक्षक आपसिंग वसावे यांनी सर्व खेळाडू विद्यार्थी-विद्यार्थीनींना क्रिडा शपथ दिली. क्रिडासंचलन घेऊन स्पर्धेची दिमाखदार सुरुवात केली. हा क्रिडामहोत्सव शनिवार दि. १३/१२/२०२५ पर्यंत चालणार आहे. रनिंग, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक अशा वैयक्तीक खेळांबरोबर कबड्डी, खो-खो, व्हाँलीबाँल, क्रिकेट इत्यादी सांघिक खेळही या क्रिडामहोत्सवामध्ये खेळविले जाणार आहेत. सुत्रसंचलन संजय जाधव यांनी केले. आभार केतकी बावकर यांनी मानले. प्रशालेचे मुख्याध्यापक टकले यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.
वायंगणी हायस्कूलमध्ये वार्षिक क्रिडामहोत्सवाला प्रारंभ











