मावळे आम्ही स्वराज्याचे वैभववाडीच्या वतीने खारेपाटण किल्ला झाडा वेलींपासून करण्यात आला मुक्त

खारेपाटण (प्रतिनिधी) : “मावळे आम्ही स्वराज्याचे ” वैभववाडी विभाग यांच्या वतीने खारेपाटण किल्ल्यावर दिवाळी पासून सातत्याने स्वच्छतेच्या अनेक मोहिमा राबविण्यात येत आहेत. ह्या मोहिमा अंतर्गत किल्ल्यावर असलेली झाडे झुडपाना ज्याच्या मुळे तटबंदीचे नुकसान होऊ शकते अशा अनावश्यक झाडांझूडपा पासून किल्ल्याला मुक्त करण्यात करण्यासाठी मावळे आम्ही स्वराज्याचे वैभववाडी विभाग या टीम च्या वतीने नुकतीच मावळ्यांनी विशेष परिश्रम घेऊन खारेपाटण किल्ल्याची साफ सफाई व स्वच्छता केली.

यापूर्वी दिंडी दरवाजा शिवाय किल्ला समजण्यात येत नव्हता परंतु वैभववाडी विभागातील दुर्गसेवक / सेविकांनी मिळून पूर्ण किल्ला लोकांच्या निदर्शनास येईल अशा स्थितीत आणला. यासाठी खारेपाटण किल्ल्यावर विशेष मोहीम राबवून हे काम पूर्ण करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत किल्ल्याची पूर्व बाजू कडील दिंडी दरवाजा, त्यालगत तटबंदी, भुयारी मार्ग, दक्षिण बाजू कडील बुरुज, तसेच पश्चिम बुरुज, पश्चिम तटबंदी स्वच्छ करण्यात आली.

अनेकजण ह्या मोहिमेत सहभागी झाले होते. यश राऊत, साहिल गुरव, जय उन्हाळकर, कुलदीपक राऊत, सिद्धी राऊत,सुमेधा तावडे,अक्षय तेली, सुरज पाटील, विनय आडविलकर, सार्थक जाधव, श्रेयस बाविलकर, राज तेली, प्रथम चव्हाण, दिनेश माने, वैभव भिसे, युवराज खांडेकर यांनी किल्ल्याला झाडे वेलींपासून मुक्त करण्यासाठी विशेष श्रमदान केले.

error: Content is protected !!