सावंतवाडी (प्रतिनिधी) : वेंगुर्ल-शिंदे गटातील शिवसेनेची तालुका कार्यकारिणी बरखास्त करत नव्या नेतृत्वाची घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची माहिती शिवसेना नेते संजू परब यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर नवीन कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तालुक्याच्या नवीन प्रभारी प्रमुखपदी सचिन देसाई यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहितीही संजू परब यांनी दिली. यावेळी बोलताना संजू परब म्हणाले, “त्यांनी राजीनामा का दिला हे मला माहित नाही; मात्र त्यांनी राजीनामा दिला असला तरी ते आमच्यासोबतच राहणार आहेत. ते कुठेही जाणार नाहीत. त्यामुळे कोणत्याही परिणामाची आम्हाला चिंता नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.












