निबंध, वक्तृत्व, रांगोळीत बाजी
फोंडाघाट (प्रतिनिधी) : ज्ञानवर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट, तळेरे यांच्यामार्फत तळेरे महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतर कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये फोंडाघाट येथील न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय कामगिरी करत उज्वल यश संपादन केले आहे. विविध स्पर्धा प्रकारांत विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून ज्युनिअर कॉलेजचा नावलौकिक वाढवला आहे.
निबंध स्पर्धेत नम्रता हुंबे (११वी कला) हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर अनिशा चौहान (१२वी विज्ञान) आणि अनुजा पाटील (११वी विज्ञान) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. वक्तृत्व स्पर्धेत शितल गुरखे (१२वी विज्ञान) हिने प्रथम क्रमांक पटकावला. खुशी सावंत (११वी विज्ञान) हिला द्वितीय, तर श्रद्धा लाड (१२वी विज्ञान) हिला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. रांगोळी स्पर्धेच्या सांघिक प्रकारात दिव्या नानचे आणि वेदिका सुतार (११वी विज्ञान) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. रेणुका मुणगेकर आणि शर्वरी शेळके (१२वी कला) यांच्या संघाने तृतीय, तर चैताली कदम आणि जान्हवी पाटील (१२वी कला) यांच्या संघाने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राध्यापक एस. आर.जोईल, एस.व्ही.सावंत, डी.बी.फड, एम.के. नारिंगकर आणि ए. एल. वाळवे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व संचालक मंडळ, शाळा समिती चेअरमन त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक पी.के.पारकर, पर्यवेक्षक व्हि. पी. राठोड, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.












