अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांची प्रमुख उपस्थिती
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हा होमगार्ड कार्यालय सिंधुदुर्ग येथे 79वा होमगार्ड वर्धापन दिन सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा होमगार्ड वर्धापन दिन सप्ताह मध्ये आपापल्या पथकामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, होमगार्डची रॅली तसेच दिनांक 12 डिसेंबर, 2025 रोजी जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 30 होमगार्ड सैनिकांनी रक्तदान केले तसेच दिनांक 13 डिसेंबर, 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता होमगार्ड कार्यालय सिंधुदुर्ग येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय सिंधुदुर्गच्या नयोमी साटम जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी उपस्थित सर्व होमगार्ड सैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि बहुमोल असे मार्गदर्शन देखील केले. सदर कार्यक्रमास सिंधुदुर्ग होमगार्ड कार्यालयाचे एन. व्ही. परब प्रशासिक अधिकारी, एन. एस. ठाकूर फलटण नायक, आर. बी. नाईक प्रमुख लिपिक, एस. एन. बटवाले कनिष्ठ लिपिक, व्हि. वाय. परब सैनिक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी पोलीस ठाण्याचे प्रभारी समादेशक अधिकारी दीपक मेस्त्री कणकवली, वर्षा पावसकर कणकवली, कविता पाताडे कुडाळ, संदेश गंगावणे कुडाळ, संतोष मातोंडकर वेंगुर्ला, मंगेश जाधव देवगड, सरिता जाधव कुडाळ, देविदास खडपे मालवण हे अधिकारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त होमगार्ड सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












