तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे ‘माजी विद्यार्थी विद्यार्थिनी स्नेह मेळावा’ उद्या शनिवार दि.१३ डिसेंबर, २०२५ रोजी स.११ ते १ वा. कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे असेल – स्वागत व दिपप्रज्वलन, विद्यालय प्रगतीवृत्त परिचय, माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा आठवणींचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याला कासार्डे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे शाळा व्यवस्थापन समिती, तसेच प्राचार्या बी.बी. बिसुरे यांनी केले आहे.












