माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला वराडकर हायस्कूल कट्टाच्या निसर्ग निवास शिबिराचा आनंद

चौके (प्रतिनिधी) : वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांच्या निसर्ग निवास शिबिराचे आयोजन मालवण तालुक्यातील कुणकवळे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणकवळे येथे करण्यात आले. या दोन दिवसीय निसर्ग निवास शिबिरात स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्वतः जेवण बनवण्याचा आनंद घेतला. त्याचबरोबर स्काऊट गाईडच्या अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिकेही केली. या शिबिरात विद्यार्थ्यांनी संघ भावना, नेतृत्व गुण, मेहनत करण्याची तयारी, जीवन कौशल्य, सहकार्य भावना असे विविध गुण प्रत्यक्ष कृतीतून अनुभवले. त्याचबरोबर शेकोटी कार्यक्रमातून आपल्या विविध कलागुणांना वाव दिला.

स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपताना कुणकवळे गावातील ओहोळावर वनराई बंधारा घालत पाणी आडवा, पाणी जिरवा हा संदेश दिला व जल संवर्धनामध्ये आपला सहभाग दर्शविला. या शिबिरासाठी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या मुख्याध्यापिका व गाईड कॅप्टन देवयानी गावडे, स्काऊट गाईड विभाग प्रमुख समीर चांदरकर, स्काऊट मास्टर एकनाथ राऊळ, किसन हडलगेकर, भूषण गावडे, गाईड कॅप्टन सिमरन चांदरकर, अमिषा परब, माजी शिक्षिका संध्या तांबे, ज्योती मालवदे, प्रकाश कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

या निसर्ग निवास शिबिरास माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय कविता शिंपी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशालेतील विद्यार्थी, स्काऊट गाईड शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थाचालक यांचे हा उपक्रम राबवल्याबद्दल कौतुक केले. जीवनात येणाऱ्या समस्यांवर मात कशी करायची याचे शिक्षण निसर्ग निवास शिबिरातून आपल्याला मिळते. शिबिरात मिळणाऱ्या कौशल्यचा वापर आपण आपल्या पुढील आयुष्यात करायचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही ठराविक शाळांमध्येच निवासी निसर्ग निवास शिबिराचे आयोजन केले जाते. त्यातही मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टा सातत्याने स्काऊट गाईड निसर्ग निवास शिबिराचे आयोजन करत आहे असे गौरव उदगार काढले. तसेच या शिबिरास प्रत्यक्ष भेट देत माध्यमिक शिक्षणाधिकारी शिंपी, स्मिता कम्प्युटर्स, संध्या तांबे, प्रकाश कदम, नांदोस उपसरपंच विजय निकम, पेंडूर उपसरपंच सुमित सावंत, तिरवडे उपसरपंच सुशील गावडे, सतीश वाईरकर, श्रीकृष्ण गावडे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ साठी पैसे दिले.

या शिबिरास कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री आनंद वराडकर, कुणकवळे गावचे सरपंच, मंदार वराडकर, जि. प. केंद्र शाळा कुणकवळेचे मुख्याध्यापक विलास सरनाईक व कुणकावळे गावचे ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲडव्होकेट एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर, संचालिका स्वाती वराडकर तसेच सर्व संचालक व संचालिका, स्मिता कम्प्युटरच्या संचालिका श्रद्धा नाईक यांनी या स्तुत्य उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!