खारेपाटण जुनिअर कॉलेज येथे बाल लैंगिक शोषण विषयक कार्यशाळा संपन्न

“बालकांचे संरक्षण आपली सर्वांची जबाबदारी” – नम्रता नेवगी

खारेपाटण (प्रतिनिधी) : “बालकांच्या मूलभूत गरजांपेक्षा ही आता समाजात वाढणारी व्यसनाधिनता व बालकांचे होणारे लैंगिक शोषण याबाबत त्यांना शिक्षण देणे आवश्यक असून बालकांचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे भावपूर्ण उदगार महिला बाल कल्याण समिती सिंधुदुर्गच्या सदस्या तसेच बालविशेष साहयता कक्ष कुडाळच्या समुपदेशक तथा सामाजिक कार्यकर्त्या नम्रता नेवगी यांनी खारेपाटण हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.”

स्पंदन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किशोरवयीन मुलांसाठी गेली दहा वर्ष शालेय समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या संचालिका नम्रता नेवगी यांच्या माध्यमातून केले जाते. खारेपाटण हायस्कूल येथे सुद्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल लैंगिक शोषण कायदा (पोक्सो) बालक-पालक समस्या आणि व्यसनाधीनता व सायबर क्राईम या सामाजिक विषयावर कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

नम्रता नेवगी या M.S.W. (Master of social work) आणि L.L.B. अशा उच्च विद्याविभूषित असून बालकल्याण समिती सिंधुदुर्गच्या सदस्य व महिला व बालविशेष सहाय्यता कक्ष कुडाळ येथे समुपदेशक या पदावर त्यांनी काम केलेले आहे. जिल्हा बालकल्याण समितीवर गेली सोळा वर्षे समुपदेशन क्षेत्रामध्ये पुणे, कोल्हापूर व सिंधुदुर्ग येथील सामाजिक प्रकल्पावर त्यांनी आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटविला आहे. गेली पाच वर्ष स्पंदन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समुपदेशन करण्याचे एक अविरत कार्य नम्रता नेवगी यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किशोरवयीन मुलांच्या समस्या, सुजाण पालकत्व, मुलं समजून घेताना, बाल लैंगिक शोषण कायदा, बालक पालक समस्या, व्यसनाधीनता अशा विविध सामाजिक विषयांवर कार्यशाळेचे आयोजन केले जाते.

त्यांच्या या कार्याची दखल घेत सन २०२१-२२ चा जिल्हा महिला बालविकास विभागाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. नम्रता नेवगी यांचे प्रशालेच्या वतीने पर्यवेक्षक संतोष राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर प्रशालेतील सहा. शिक्षक सुबोध देसाई, सहा. शिक्षिका सौ. महिंद्र, सौ. कोकाटे, सौ. पाताडे उपस्थित होत्या. ज्युनियर कॉलेज विभागातील प्राध्यापक श्री. देसाई यांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्य शाळेसाठी विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!