कासार्डे विद्यालयाच्या सार्थक वायंगणकरची शालेय विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने कुडाळ हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुलांच्या गटात कुमार सार्थक वायंगणकर इ. ७ वी ‘ब’ याने चमकदार कामगिरी करत चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. त्याची कोल्हापूर विभागीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे शिक्षक प्रा. विनायक पाताडे, अनिलकुमार जमदाडे, नवनाथ कानकेकर यांच्यासह विद्यालयाचे क्रीडाशिक्षक दत्तात्रय मारकड व क्रीडा विभागातील इतर शिक्षकांचेही विशेष मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष संजय पाताडे व स्कुल कमिटीचे सर्व सदस्य तसेच संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी तसेच कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालक-शिक्षक संघ आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, सचिन रणदिवे आदींनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!