दुस-या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलला सिंधुदुर्गातील शशिकांत तांबे निमंत्रित !

तळेरे (प्रतिनिधी) : 1948‌ साली पुण्यात भिडेवाड्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबाराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली.त्यांच्या या कार्यात फातिमा बी शेख यांनी ही मोलाची साथ दिली.ही ज्ञानाची धगधगती ज्योत सदैव प्रज्वलित राहावी म्हणून जि.प.शाळा,पेडांबे,ता.मुळशी ,जि.पुणे येथील संविधान दूत,फुले प्रेमी,साहित्यिक शिक्षक विजय वडवेराव यांच्या अथक प्रयत्नातून 2 त 5 जानेवारी 2025 रोजी पुण्यातील एस.एम.जोशी सभागृहात दुस-या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल 2026 चे आयोजन केले आहे.संविधानाचा बचाव व जागर करण्यासाठी देश-विदेशातून व भारतातील 36राज्यांतून फुलेप्रेमी व संविधान प्रेमी लेखक व साहित्यिक उपस्थित राहून आपली मुलींची पहिली शाळा,महात्मा ज्योतिबा फुले,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व संविधानावर कविता सादर करणार आहेत.उपस्थित सर्व संविधान व फुले प्रेमी साहित्यिक चारही दिवस या फेस्टिव्हलचे अध्यक्ष असणार आहेत.हे या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे वैशिष्ट्य आहे.4जानेवारी 2025रोजी कवितेचे सादरीकरण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक शिक्षक शशिकांत तांबे यांना फेस्टिवलचे आयोजक साहित्य शिक्षक विजय वडवेराव यांनी निमंत्रित केले आहे.कवी शशिकांत तांबे संविधानावर आधारित स्वरचित कवितेचे सादरीकरण करणार आहेत.कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.संविधान जागराची दखल “वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड”यांनी घेतली आहे. उपस्थित सर्वांना सन्मान चिन्ह,सन्मापत्र , संविधान पॅड,पुस्तक देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.सिंधुदूर्ग जिल्ह्यातून या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलला फुले प्रेमी व संविधान दूत म्हणून निवड झाल्या बद्दल शशिकांत तांबे यांचे समाजाच्या विविध स्तरांतून हार्दिक अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!