सततच्या पराभवाने राजन तेलींचे मानसिक संतुलन बिघडले

राजन तेली स्वतः प्रशिक्षित दरोडेखोर ; वैयक्तिक रागापोटी जिल्हा बँकेवर आरोप

बँकेची नाहक बदनामी खपवून घेणार नाही ; तेलींवर कायदेशीर कारवाई करणार

तेली स्वतः जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे टाळत होते

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : 2014 पासून सतत होणाऱ्या पराभवामुळे राजन तेली यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. राजकीय रागापोटी जिल्हा बँकेवर तेली आरोप करत आहेत. दरोडेखोरांपासून जिल्हा बँक वाचवावी म्हणणारे राजन तेली हे स्वतः प्रशिक्षित दरोडेखोर आहेत. आमदार निलेश राणेंनी केलेल्या ट्विट मधून तेली बोध घेणार काय ? असा सवाल करतानाच राजन तेली यांनी बँकेचा लोगो वापरून पत्रकार परिषद घेतली तसेच कर्जदाराचा तपशील उघड करून नियमभंग केला आहे. त्यामुळे तेली यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे जिल्हा बँक अध्यक्ष मानिष दळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्हा बँकेवर वैयक्तिक राग काढण्यासाठी राजन तेली यांनी बँकेवर नाहक आरोप केले आहेत. आयकर विवरण पत्र बघूनच बँक कर्जपुरवठा केला जातो. तेली यांच्या मुलांच्या नावाने कर्ज मंजुर करताना तेली यांचीही तेवढी पात्रता नव्हती. जून 2021 मध्ये 9 कोटी कर्ज 15 टक्के व्याजाने तेली यांनी जिल्हा बँकेकडून घेतले. त्या कर्जपोटी त्यांनी 2 वर्षे व्याज आणि त्यानंतर हफत्यासह व्याज भरणे अपेक्षित होते. मात्र कर्ज थकीत असल्याने तारण असलेले व्यापारी गाळे विकून कर्जफेडी ची परवानगी मागितली. त्यानुसार त्यांना गाळे विक्री करून कर्जफेडी ची मुभा दिली. त्यांनतर व्याज दरात सवलत देत 43 लाख रुपयांची सवलत बँकेने तेली याना दिली. मात्र राजन तेली यांनी गाळे विकुनही मिळालेली रक्कम कर्जापोटी भरली नाही. 21 डिसेंबर 2023 रोजी तेली यांचे कर्जखाते थकबाकीत गेले. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही तेली यांनी थकबाकी रक्कम भरली नाही. तेली यांच्या एका थकबाकी कर्जाने बँकेला एनपीए रेशीओ 96 टक्के पर्यंत गेले. त्यामुळे बँकेला कर्ज वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करणे भाग पडले. कर्जाच्या रक्कमेचा तेली यांनी गैरवापर केला. अखेर सहकार कोर्टात दावा केल्यानंतर तेली यांच्या विरोधात निर्णय देत बँकेच्या बाजूने निर्णय दिला. कोर्ट ऑर्डरनुसार तेली यांच्या सिंधुदुर्ग आणि रायगड येथील प्रॉपर्टी वर अटॅचमेंट करण्यात आली. नंतर मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाने राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश आणि सर्वेश याना त्यांचे पूर्ण कर्जफेड करण्यासाठी सूचना केली. त्यानंतर वाढीव मुदत घेऊन तेली यांनी 15 कोटी 29 लाख 60 हजार व्याजासह पूर्ण कर्जफेड केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मागील 17 वर्षे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेने घोडदौड करत आहे. खासदार राणे यांचा जिल्हा बँकेच्या कारभारावर बारीक लक्ष असतो. गैरप्रकार होऊ नये याची दक्षता खासदार राणे घेतात. म्हणूनच जिल्हा बँकेवर राणेंच्या विचाराचे संचालक निवडून येतात. जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना उद्योजक म्हणून घडविण्याचे काम जिल्हा बँकेने करावे असे खासदार राणेंचा आग्रह असतो. त्यासाठीच केंद्रीय उद्योगमंत्री असताना खासदार राणेंनी एमएसएमई तसेच अन्य योजनांना जिल्हा बँक जोडून दिली होती. जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा करून त्यातून होणारा नफा हा ठेवीदार तसेच खातेदारांना लाभदायी होतो.

यावेळी बँक संचालक दिलीप रावराणे, महेश सारंग, विठ्ठल देसाई, ऍड.समीर सावंत, नीता राणे, गणपत देसाई, बाबा परब, व्हिक्टर डांटस, आत्माराम ओटवणेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी उपस्थित होते

error: Content is protected !!