नागवेकर हॉस्पिटल तोडफोडीचा डॉक्टर असोसिएशनकडून निषेध
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कासार्डे येथील कस्तुरी पाताडे या युवतीच्या मृत्यूनंतर वस्तुस्थिती समजून न घेता काही समाज विघातक वृत्तीनी कायदा हातात घेत कणकवली येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटलवर हल्ला केला. हॉस्पिटलची तोडफोड केली तसेच नागवेकर कुटुंबियांतील महिला डॉक्टर्स वर व नर्सिंग स्टाफवर हल्ला केला. त्याचा सिंधुदुर्गमधील सर्व डॉक्टर्स संघटनानी तीव्र निषेध व संताप व्यक्त केला आहे व या घटनेचा निषेध म्हणून आज मंगळवार दि. 16डिसेंबर, 2025 रोजी ज़िल्ह्यातील सर्व दवाखाने, हॉस्पिटल्स बंद ठेवण्यात आले आहेत. फक्त तातडीची सेवा चालू आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन डॉक्टर्स फ्रेटर्निंटी क्लब, सिंधुदुर्ग, फ्रायडे क्लब, कणकवली व इंडियन मेडिकल असोसिएशन, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.












