वैभववाडी तालुका हा नेहमीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा – खासदार विनायक राऊत

पं.स., जि.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना खासदार राऊत यांनी केले मार्गदर्शन

मतदार संघातील भेटी दरम्यान अनेक समस्या घेतल्या जाणुन

वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुका हा नेहमीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा असुन या तालुक्यामधील प्रत्येक जिल्हा परिषद विभागामध्ये ज्या समस्या असतील त्या समस्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या तालुक्यातील अनेक रस्ते,पूल, ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग, धरणे, पंचायत समिती इमारत वाढीव निधी, वाभवे – वैभववाडी नगरपंचायतसाठी भरीव निधी तसेच वैभववाडी तळेरे, गगनबावडा, भुईबावडा घाट रस्ता या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे.यापुढे सुद्धा वैभववाडी तालुक्यातील अनेक समस्या जाणुन घेऊन त्या आमच्या माध्यमातून सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू असे प्रतिपादन शिवसेना सचिव तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांनी केले. ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी बोलत होते.कोकिसरे बांधवाडी येथे शिवसेना कार्यकर्ते व यांच्या भेटी दरम्यान खासदार विनायक राऊत यांनी तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. व त्या सोडविण्यासाठी आपण तात्काळ कार्यवाही करू असे सांगितले. यावेळी वैभववाडी तालुक्यात ग्रामपंचायत निहाय सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या निकृष्ट कामांबाबत खासदारा राऊत यांच्याकडे समस्या मांडल्या. त्यासाठी चार ते पाच दिवसानंतर संबंधीत अधिकाऱ्यांना घेऊन बैठक घेऊन त्या उर्वरित समस्येबद्दल चर्चा करून सदर ठेकेदार व लोकांना विश्वासात न घेतलेल्या  ग्रामपंचायतींवर कारवाई करण्यासाठी आपण सांगणार आहोत. यावेळी शिवसेना तालुकाप्रमूख मंगेश लोके यांनी आचिर्णे कडूवाडी रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांची खूप येजा असते या स्टेशनवरून सावंतवाडी-दादर तुतारी एक्सप्रेस गाडीला थांबा मिळावा जेणेकरून या पंचक्रोशीतील जनतेला त्याचा फायदा होईल. ही मागणी लोके यांनी खासदार राऊत यांच्याकडे केली. यावेळी अतुल रावराणे यांनी सुद्धा मार्गदर्शन करतेवेळी तालुक्यातील अनेक समस्या खासदार राऊत यांच्या निदर्शनास आणून दिल्या. वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये बी.एस.एन.एल. ची जास्तीत जास्त टॉवर मंजूर करावीत जेणे करून त्याचा फायदा येथील जनतेला होईल. तसेच अरुणा पाटबंधारे प्रकल्पाचे अनेक कालवे अपूर्ण अवस्थेत आहेत. काही जमीन मालकांना अजून त्याचा मोबदलाही मिळालेला नाही. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत. असे सांगितले. यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवणकर,श्रीराम शिंगरे,स्वप्नील धुरी, अतुल सरवटे, जावेद पाटणकर, माजी नगरसेवक संतोष पवार, वैभववाडी शहरप्रमुख शिवाजी राणे, शहर संघटक सुनील रावराणे, दीपक गजोबार आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!