चिंचवली येथील विविध विकास कामांचे आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन

दीनलक्ष्मी अरोमा फार्म चे उद्घाटन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील चिंचवली या गावातील चिंचवली भंडारवाडी रस्ता व चींचवली निनुदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरन करणे आदी विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच दीनलक्ष्मी आरोमा फार्म चे आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे कणकवली तालुका भाजप शक्ती केंद्र प्रमुख संतोष कानडे,कणकवली पं.स. माजी सभापती दिलीप तळेकर, माजी जि.प.सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार,पं.स.सदस्य सौ तृप्ती माळवदे,खारेपाटण विभाग भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,सुधीर कुबल,चींचवली सरपंच श्री अशोक पाटील,माजी सरपंच सौ.रुंजी भालेकर,श्री अनिल पेडणेकर,खारेपाटण माजी सरपंच श्री रमाकांत राऊत,किशोर माळवदे, उपसरपंच महेंद्र गुरव,शेर्पे माजी सरपंच श्रीम निशा शेलार, कुरगावणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे,नडगिवे माजी उपसरपंच अरुण कर्ले,राजेंद्र वरूनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार नितेश राणे यावेळीय चिंचवली भंडारवाडी येथील युवक श्री मंदार पेडणेकर यांनी उभारलेल्या कुकुट्ट पालन प्रकल्पाला भेट देऊन त्याची पाहणी केली.”दीनलक्ष्मी अरोमा फार्म” नावाने सुरू केलेल्या अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्ज असलेल्या या अंडी उत्पदान केंद्राचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.तसेच पक्ष्यांना खाद्य पुरविणे यंत्र सामुग्री चे खाद्य सेंटर चे उदघाटन देखील यावेळी आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.चिंचवली गावचे ग्राम दैवत असलेल्या श्री निणुदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी ग्रामविकास निधीतून २५/१५ योजनेतून ५ लाख रुपये निधी मंजूर झाला असून या रस्त्याचे भूमिपूजन व कामाचा शुभारंभ कणकवली तालुका भाजप शक्ती केंद्र प्रमुख श्री संतोष कानडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. तसेच चिंचवली मुख्य रस्ता ते भंडारवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी ग्रामविकास विभागाच्या २५/१५ योजनेतून सुमारे ७ लाख रुपये निधी मंजूर झाला असून या रस्त्याच्या कामाचे देखील भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी चिंचवली येथील ग्रामस्थ तसेच खारेपाटण विभागातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!