जिल्हा निवड चाचणीचा कबड्डी स्पर्धेचा थरार फोंडाघाट मध्ये तीन व चार जानेवारी रोजी

वरिष्ठ पुरुष व महिला जिल्हा निवड चाचणी स्पर्धा 2025-26 मधून जिल्हा संघाची घोषणा

फोंडाघाट पंचक्रोशी कला-क्रीडा-सांस्कृतिक मंडळाचे आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने आणि कणकवली तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने, वरिष्ठ पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५-२६, जानेवारी तीन व चार रोजी सावंत पटेल कंपाऊंड, बिजलीनगर येथे, पंचक्रोशी कला- क्रीडा- सांस्कृतिक मंडळांनी आयोजित केले आहे. गेली ३० वर्ष फोंडाघाट मध्ये कबड्डी स्पर्धा आणि खेळाडूंचे एक वेगळेच नाते असून, त्यांना लक्षवेधी वारसा लाभला आहे. स्पर्धेचे नियोजन अंतिम टप्प्यात असून, कबड्डी प्रेमींना जिल्हास्तरीय कबड्डीचा थरार अनुभवास मिळणार आहे. या स्पर्धेसाठी दोन्ही विभागात मिळून सुमारे ७० हजाराची रोख पारितोषिके असून, आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. यामध्ये महिला/ पुरुष जिल्हास्तरीय संघ जाहीर करण्यात येईल. या स्पर्धेला पंचक्रोशीतील क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहून, सहकार्य करावे असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!