वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची स्पर्धा
तळेरे (प्रतिनिधी) : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय नाथ पै एकांकिका स्पर्धेत शालेय गटात सावी वैभव मुद्राळे हिने उत्कृष्ट स्त्री नायिका द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
तिने युथ फोरम देवगड यांच्या ‘लगोरी’ या एकांकिकेत ‘DJ’ ही भूमिका साकारली होती. यासाठी तिला आज्ञा अभिषेक कोयंडे तसेच अभिषेक कोयंडे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. ती कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे मध्ये इयत्ता सहावीत शिकत आहे. या स्पर्धेचे परीक्षण प्रदीप वेंगुर्लेकर, डॉक्टर प्रिया जामकर, तुषार भद्रे यांनी केले.
यापूर्वी सावी मुद्राळे हिने झी मराठी वाहिनीवरील ‘ड्रॉमा ज्युनिअर’ टॉप पाच मध्ये स्थान घेऊन घराघरात पोहोचली आहे. तिच्या या यशाबद्दल कासार्डे प्रशालेचे संस्था पदाधिकारी, प्राचार्या, पर्यवेक्षक शिक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सावी मुद्राळे हिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.












