अश्विनी अशोक मोरे यांचे निधन

बांदा (प्रतिनिधी) : येथील डोंगरआळी परिसरातील अश्विनी अशोक मोरे (वय 53) यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी बांदा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू, दिर, भावजया असा परिवार आहे. बांदा येथील चणे व शेंगदाणे व्यापारी अशोक मोरे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या अकाली निधनाने बांदा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!