तब्बल बावीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर परमार्थ निकेतनची मागणी पूर्ण
कुडाळ (प्रतिनिधी) : सण २००२ पासून कुडाळ परमार्थ निकेतन येथे स्ट्रीट लाईट बसवा अशी मागणी परमार्थ निकेतनच्या व्यवस्थापकांकडून केली जात होती. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी अशीच मागणी कुडाळ नगरसेविका प्राजक्ता आनंद शिरवलकर यांच्याकडे केली होती. नगरसेविका प्राजक्ता शिरवलकर यांनी तातडीने या मागणीची दखल घेत परमार्थ निकेतन येथे स्ट्रीट लाईट उभारणी करून दिली. कालच परमार्थ निकेतन येथे झालेल्या हरिनाम सप्ताहाच्या समाप्तीनंतर या स्ट्रीटलाइटसाठी प्रयत्न करणाऱ्या नगरसेविका प्राजक्ता आनंद शिरवलकर यांचा सत्कार परमार्थ निकेतनच्या वतीने करण्यात आला. केली बावीस वर्षाची मागणी पूर्ण झाल्याचं समाधान परमार्थ निकेतन करून व्यक्त करण्यात आलं आहे.













