चंद्रस्वा क्रिएशन संस्थेतर्फे खारेपाटण ज्यूनिअर कॉलेज येथे मुलींसाठी आरोग्य विषयक जनजागृती शिबिर संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटण येथे नुकतेच “चंद्रस्वा क्रिएशन” संस्थेतर्फे मुलींमध्ये आरोग्य विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात किशोर वयीन मुली व महिलांसाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

महिलांमध्ये वाढणारे कॅन्सरचे प्रमाण याविषयी विद्यार्थिनींना या वयातच दक्षता घेणे गरजेचे आहे. हे पटवून देणे ही काळजी गरज ओळखून या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सहम्यात आले. यावेळी विद्यार्थिनींना आपल्या आरोग्याविषयी जागृत राहण्याचे आवाहन चंद्रस्वा क्रिएशन संस्थेचे स्नेहल पेडणेकर व रूपाली देसाई यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

विद्यार्थिनींना मासिक पाळी विषयी व बांबू पासून बनविलेल्या बायो सॅनिटरी पॅड विषयी माहिती यावेळी देण्यात आली. तर मासिक पाळी मध्ये वापरण्यात येणारे प्लास्टिक पासून बनवलेले सॅनिटरी पॅड वापरल्यामुळे त्याचे होणारे दुष्परिणाम व महिलांमध्ये वाढणारे कॅन्सरचे प्रमाण याविषयी विद्यार्थिनींना या वयातच दक्षता घेणे गरजेचे आहे, असे मत स्नेहल पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व महिला शिक्षिका व आर्या कानडे उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन सारिका महिंद्रे यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना पाताडे व आभार सौ. अमृते यांनी मानले.

error: Content is protected !!