कुडाळ (प्रतिनिधी) : चिमणी पाखरे प्री प्रायमरी स्कूल कुडाळचा मूल्यांकन प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. भौतिक सुविधाची उपलब्धता, शिक्षक प्रशिक्षण, अध्यापन पद्धती, शैक्षणिक गुणवत्ता अशा विविध निकषाच्या मूल्यांकनानंतरच हे मूल्यांकन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. कुडाळ तालुक्यातील ही पहिली मूल्यांकन प्राप्त शाळा असून नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित अभ्यासक्रम, स्कूल ऍप, शिक्षक प्रशिक्षण अशा विविध सुविधांचा लाभ या शाळेला घेता येणार आहे.
या कार्यक्रमास पूर्व प्राथमिक शाळा मान्यता परिषद इंडियाचे पदाधिकारी डॉ. हर्षित पटेल, डॉ. राजेश मोहतुरे, आदित्य बिसेन, जिल्हा समन्वयक रुपाली कदम, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका साक्षी बिर्जे यांनी केले तर सूत्रसंचालन सहशिक्षिका रोशनी पटेल यांनी केले.












