विद्यार्थ्यांनी स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली अंगीकारा व कुष्टरोग जनजागृती कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा – उदय ठकार

हिंद कुष्ट निवारण संघ महाराष्ट्र शाखा – वडाळा यांच्या वतीने कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत मार्गदर्शन संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : अर्जुन रावराणे विद्यालय व श्री.जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे विद्यार्थ्यांसाठी आज हिंद कुष्ठ निवारण संघ महाराष्ट्र, शाखा – वडाळा मुंबई यांच्या वतीने कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये कुष्टरोग जनजागृती वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे. जेणेकरून ते स्वतःचे आणि इतरांचे स्वास्थ्य राखू शकतील. कुष्टरोगाची ओळख लवकर झाली तर उपचार करणे शक्य होऊन कुष्टरोगाचा प्रसार रोखता येतो व विद्यार्थ्यांना स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली अंगीकारण्यास प्रोत्साहन मिळते. कुष्ठरोग लक्षणे, प्रतिबंध व उपचार याबाबत हिंद कुष्ठ निवारण संघ संस्थेचे कार्यवाह उदय ठकार यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच स्वास्थ्यपूर्ण आहार, व्यायाम आणि ताणमुक्ती याबद्दल प्रोत्साहन दिले व स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली अंगीकारा व कुष्टरोग जनजागृती कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी संस्थेच्या सहाय्यक प्रकल्प संयोजिका प्रभा पटवर्धन, प्रशालेचे मुख्याध्यापक बी. एस. नादकर व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!