वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शनिवारी दुसऱ्या दिवशी 5 जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती उमेदवारी अर्ज विक्री झाले आहेत. गेल्या दोन दिवसात एकूण 27 अर्ज विक्री करण्यात आले.
जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीसाठी दिनांक 16 जानेवारी 21 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत निश्चित करण्यात आली आहे. वैभववाडी पंचायत समिती कार्यालयात निवडणूक विभागाकडून निवडणूक अर्ज विक्री व स्वीकारण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सूर्यकांत पाटील गटविकास अधिकारी श्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या ठिकाणी पोलीस सुद्धा तयार करण्यात आले आहेत.
रविवार दिनांक 18 रोजी कार्यालयीन सुट्टी असल्यामुळे या दिवशी फॉर्म विक्री किंवा स्वीकारणे बंद राहणार आहे. तर सोमवारपासून पुन्हा सकाळी साडेदहा ते तीन वाजेपर्यंत विक्री व अर्ज स्वीकारले जाणार आहेत.












