तिसरी ते सातवीचे 187 विद्यार्थी प्रविष्ठ
चौके (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा आज जिल्ह्यात संपन्न होत असून मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कुल कट्टा येथील केंद्रावर केंद्र संचालक रामदास तांबे आणि प्रकाश कानूरकर यांच्या मार्गदर्शन आणि नियंत्रणाखाली कट्टा केंद्रातील STS परीक्षेस सुरुवात झाली आहे. या केंद्रावर तिसरी, चौथी, सहावी आणि सातवीचे एकूण 187 विद्यार्थी विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. या परीक्षेसाठी केंद्र संचालक रामदास तांबे, प्रकाश कानूरकर आणि सुदेश गोलतकर हे शिक्षक पर्यवेक्षक म्हणून काम पाहत आहेत.












