असलदे दिवाणसानेवाडी येथे माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे दिवाणसानेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून या निमित्ताने परंपरेनुसार श्री सत्यनारायण महापूजा तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता अभिषेकाने होणार असून, ९ वाजता श्री गणेश पूजन केले जाणार आहे. सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वाजता महाआरती व त्यानंतर १ ते ३ या वेळेत महाप्रसाद वाटप होणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ८ वाजता संगीत भजन कार्यक्रम होणार असून, रात्री ९.३० वाजता सुप्रसिद्ध भजनी बुवांच्या डबलबारी भजनाचा जंगी सामना रंगणार आहे. या २०-२० डबलबारी सामन्यात श्री स्वामी समर्थ भजन मंडळाचे बुवा सुनील गोंधळकर श्री मालवीर भूतनाथ महापुरुष प्रा. भ. मंडळ, पाळेकरवाडीचे बुवा शुभम पाळेकर यांच्या कलेचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

सदर कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी कुटुंबासह उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन असलदे दिवाणसानेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!