नियोजनबद्ध बंधारा बांधणीला सुरुवात; वैभव मालंडकर यांच्या मागणीला यश

ग्रामस्थांनी नगराध्यक्ष संदेश पारकर आणि वैभव मालंडकर यांचे मानले आभार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील गणपती साना परिसरात नियोजनबद्ध बंधारा बांधण्याबाबत वॉर्ड प्रतिनिधी व समाजसेवक वैभव मालंडकर यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले असून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या संदर्भात मा. नगराध्यक्ष संदेश भास्कर पारकर यांनी तातडीने पाठपुरावा करत संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यामुळे गणपती साना येथे बंधाऱ्याच्या नियोजनासह प्राथमिक कामे सुरू करण्यात आली आहेत.

सदर ठिकाणी पाणीसाठा वाढवणे, गाळ काढणे (डिसिल्टिंग), नागरिकांसाठी सुरक्षित वापराची व्यवस्था तसेच जनावरांसाठी स्वतंत्र जागा याबाबत नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाणार आहे. यामुळे पावसाळ्यानंतरही पाणीसाठा टिकून राहण्यास मदत होणार असून, भविष्यातील पाणीटंचाईचा धोका कमी होणार आहे.
काम सुरू झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी नगराध्यक्ष संदेश पारकर आणि वैभव मालंडकर यांचे मनापासून आभार मानले असून, नागरिकांच्या गरजांसाठी तत्परतेने निर्णय घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. कोणतीही पदाची अपेक्षा न ठेवता केवळ शहर व नागरिकांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे हे उदाहरण असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!