पियाळीमध्ये भजनी मंडळ आणि फुगडी मंडळांना साहित्य वाटप ; पियाळी ग्रामपंचायत चा उपक्रम
कणकवली (प्रतिनिधी) : “भजन आणि फुगडी ही केवळ कला नसून आपल्या गावच्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख आहे. ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत जिवंत राहावी आणि आपल्या कलाकारांना आवश्यक ते पाठबळ मिळावे, या उद्देशाने पियाळी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आज गावातील सर्व भजनी मंडळांना भजनी साहित्य तसेच महिला फुगडी मंडळांना साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देणे आणि आपल्या लोककलेचे जतन करणे हीच या उपक्रमामागची मुख्य भावना आहे. यापुढेही कलाकारांच्या हितासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील असे प्रतिपादन सिंधुदुर्ग भजनी कलाकार संस्था अध्यक्ष व कलाकार मानधन समिती सदस्य संतोष कानडे यांनी केले.सिंधुदुर्ग भजनी कलाकार संस्था अध्यक्ष व कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग सदस्य संतोष कानडे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत पियाळी यांच्या वतीने पियाळी गावातील सर्व भजनी मंडळांना भजनी साहित्याचे व महिला फूगडी मंडळाना साहित्य वाटप करण्यात आले यावेळी भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग अध्यक्ष व कलाकार मानधन समितीचे सिंधुदुर्ग सदस्य संतोष कानडे बोलत होते. यावेळी पियाळी ग्रामपंचायत सरपंच प्रवीण पन्हाळकर, उपसरपंच विजय मुरकर, ग्रामपंचायत सदस्य संजय ढवण, तन्वी गुरव, अपर्णा कावले, माजी सरपंच व तंटामुक्ती समिती पियाळी अध्यक्ष दामोदर नारकर, माजी उपसरपंच बाळा करमळकर कासार्डे पियाळी विकास सोसायटी व्हाईस चेअरमन.बाबू घाडी,सुनील तेली, वाडी प्रमुख शरद नारकर चंद्रकांत वंजारे यशवंत तेली संदीप मुरकर तसेच गावातील सर्व भजनीबुवा व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.












