शिवसेना जानवली जि.प. विभागप्रमुख पदी रविंद्र खांदारे

शिवसेना जिल्हाप्रमुख, मा.आ. वैभव नाईक, कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिले नियुक्ती पत्र

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली तालुक्यातील जानवली जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी रविंद्र नामदेव खांदारे (रा. सावडाव) यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज नियुक्तीचे पत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच पक्ष संघटना वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले.

यावेळी कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, ज्येष्ठ शिवसैनिक जयसिंग नाईक, वैभव सावंत,नयना सावंत, सुरेश मोरे,उल्हास गावकर, अरविंद वारंग,संदीप वारंग,विजय राणे,विजय कदम,तुकाराम सावंत,तेजस सावंत,रमाकांत देऊलकर, संतोष तेली, अक्षय कदम,रचना खांदारे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!